पुढील वाटचालीमध्ये खालील बाबींचा समावेश आहे.

• दीर्घ मुदतीकरिता आर्थिक विकसन आराखडा तयार करणे.

• पुणे महानगर प्रदेशाकरिता निर्धारित केलेले नागरीकरणाचे उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी स्थानिक शासन पातळीवर सुसंवाद प्रस्थापित करणे.

• सार्वजनिक व्यवस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून शासन प्रणाली विकासाद्वारे उत्तम व्यवसाय सुलभता उपल्ब्ध करून देणे.

• उत्पादन, सेवा, पर्यटन, गृह, आणि इतर उभरत्या क्षेत्रांचे आर्थिक नियंत्रक घटक ओळखणे, त्यांना प्रोत्साहन देणे तसेच त्यांचे नियोजन.

• पुणे महानगर क्षेत्रातील नागरिकांना उतमोत्तम सेवा पुरवणाऱ्या एका अद्ययावत संस्थेची उभारणी.

• सशक्त आणि भक्कम डिजिटल हातमिळवणी साध्य करणाऱ्या वास्तविक कार्यालयाची उभारणी.

• संस्कृतीक व ऐतिहासिक विकास आराखडा तयार करणे.

• उच्चतम व्यवसाय सुलभता निर्माण करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी अनेक साधनांचे आरेखन करून त्याचा वापर करावा लागेल. उदाहरणार्थ - अस्तित्वातील जमिनी वापराचे नकाशे तयार करणे, प्रदेशाचे सूक्ष्म - आरेखन, लँड पार्सल, भूप्रदेश, साँइल - स्टँटा मँपिंग या साऱ्यांचे भूगर्भ शास्त्रीय- संदर्भ अन्वेषण तथा साठवण (जिओ-रेफरन्सिंग) करणे इ. तसेच सर्व सरकारी कार्यालयासोबत दुवा म्हणून एक अडथळा मुक्त मार्गिका उपलब्ध करून देणे, जेणेकरून व्यवसाय सुलभतेचे सुलभीकरण आणखी प्रभावी करता येईल.

Top