Government of Maharashtra Satyameva Jayate

पार्श्वभूमी :

पीएमआरडीए अर्थात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, ही पुणे महानगर प्रदेशाच्या विकासाच्या सुसूत्र नियोजनाप्रती शिस्तबद्ध योजनात्मक दृष्टीकोन आणि अधिकार असलेली वैधानिक संस्था आहे.

एक अग्रगण्य नागरी लोकसंस्था म्हणून गेल्या तीस वर्षापासून पुणे शहराची वाटचाल सुरु आहे. विद्येचे माहेरघर म्हणून परिचित असलेल्या या शहराने आजवर अनेक व्यवसाय, उद्योगादी क्षेत्रांना जिल्हा – राज्य – देशाच्या सीमा ओलांडून परदेशात देखील कुशल आणि प्रतिभावान मनुष्यबळ पुरविले आहे. परिणामस्वरूप ‘एक कालानुरूप उद्द्म केंद्र’ म्हणून पुण्याची ओळख झपाटयाने निर्माण झाली असून, ‘प्रचंड जोमाने विकसित होणारे सर्वसमावेशक शहर’ म्हणून आज ओळखले जात आहे.

पुणे परिसराच्या ह्या औद्योगिक उत्क्रांतीमुळेच एक ‘विकासाचे प्रमुख केंद्र’ तसेच ‘गुंतवणुकीसाठी अत्यंत आकर्षक ठिकाण’ म्हणून आज पुणे परिसराची ओळख निर्माण झाली आहे. नवीन बाजारपेठ, व्यवसाय विस्तार आणि भविष्यकालीन प्रगती यांसाठी जगभरातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या या प्रदेशाकडे आकर्षित होत असलेने गुंतवणूकदार आणि पुणे महानगर प्रदेश या दोहोंचाही यामधून फायदा सुनिश्चित आहे. आनंददायी आरोग्यवर्धक वातावरण, नैसर्गिक साधनांची मुबलकता, समृध्द परंपरा, संस्कृती आणि सर्वात महत्वाचे म्हणजेच देशाची आर्थिक राजधानी मुंबई अगदी जवळ असणे – अशा अनेक अंगांनी पुणे परिसरास वरदान लाभले आहे. नवीन आणि अस्तित्वातील उद्योग वाढीसाठी उत्तेजना देण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत.

पुणे शहर, मावळ, मुळशी, हवेली तहसिलचा पुर्ण भाग तसेच भोर,दौंड,शिरूर,खेड,पुरंदर आणि वेल्हे तालुक्यातील भाग हे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये समाविष्ट आहेत. महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास विभागातर्फे ३१ मार्च २०१५ रोजी कायदेशीर अधिकार असलेली एक स्वायत्त आर्थिक ‘सामुदायिक संस्था’ म्हणून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे गठन करणेत आले. यातील बहुतांश प्रदेश हा हरीतविकास संकल्पनेमध्ये (ग्रीनफिल्ड डेव्हलपमेंट) समाविष्ट आहे. हा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा सर्वात मोठा फायदा आहे.


रचनाः

क्षेत्रफळ: ७,२५६.४६ चौ. किलोमीटर
लोकसंख्या: ७२.७६ लाख (अंदाजे)
महानगरपालिकेची संख्याः
समाविष्ट छावणी बोर्डसची संख्या
समाविष्ट नगरपरिषदांची संख्या
समाविष्ट गावे ८४२
जनगणना शहरेंची संख्याः १३

पुणे महानगर क्षेत्र: